धडाकेबाज हा पहिला "सिनेमास्कोप" म्हणुन गाजावाजा झाला तितकाच या चित्रपटातील तंत्रज्ञानावर आधारित बेतलेला पहिला मराठी चित्रपट म्हणुन गाजला.
या चित्रपटात गंगाराम नामक बाटलीतला लक्ष्या रसिकानी डोक्यावर घेतला.त्याचा प्रसिध्द डायलॉग आजही आठवतो.
ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते धेय्य अचूक,
तोच दिपवू शकतो जगाला होऊन खरा धडाकेबाज......
तसा हा पिक्चर शोलेची गावठी आवृत्ती होता.म्हणजे एक खाण त्यात कवटीचा मुखवटा लावून फिरणारा डाकू. एक थरार निर्माण व्हावा म्हणून त्याचं नाव कवट्या महाकाळ. त्यात काहीतरी फॅन्टेसी पाहीजे म्हणून बाटलीतला गंगाराम. आणि मग तीन दोस्तांची दुनियादारी.
कवट्या महाकाळ हे एक अती भारी कॅरेक्टर होतं. वाटलीच तर लहान मुलांना थोडीफार भिती वाटावी म्हणून महेश कोठारेंनी त्याला कवटीचा मुखवटा घातला होता.
कटप्पाने बाहुबलीला का मारंल असल्या प्रश्नांची उत्तर काळाच्या ओघात मिळाली पण कवट्या महाकाळ नेमका कोण होता याच उत्तर काय मिळत नव्हतं.फार वर्षानी खुद्द महेश कोठारे यांनीच त्याचा पर्दाफार्श केला.,तो कवठया होता“बिपिन वर्टी.”आत्ता हे बिपिन वर्टी कोण ?तर तुम्हाला झपाटलेला आठवत असेलच. तर या पिक्चरमधला खुबड्या खबीज आठवतोय का. तेच हे बिपिन वर्टी. कवट्या महाकाळची भूमिका केली होती ती बिपिन वर्टी यांनी. ते चांगले दिग्दर्शक देखील होते. त्यांनी चंगू मंगू, फेकाफेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर हे सिनेमे दिग्दर्शीत केले होते.पुढे बिपीन वर्टी यांच्या तारखांचा घोळ झाला आणि मग कवठया कोणी साकारयाचा हा प्रश्न निर्माण झाला.कवठयाच्या पात्राला ठराविक चेहरा नसल्याने मुखवटा घालून हौशी कलाकारानी ही भुमिका केली आहे.
यामुळे चित्रपटाचे शूटिंग रखडले नाही.आता हे हौशी कलाकार एकच नव्हते तर सहा सात जणांनी ही कवठया महाकाळाची भुमिका केली आहे.पण मुख्य कलांवत म्हणुन बिपिन वर्टी यांचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
या चित्रपटाताने सर्व रेकॉर्ड मोडले,मराठी चित्रपट रसिकानी गंगाराम बरोबर कवठया महकाळला डोक्यावर घेतले होते.
कोरा लिंक http://bit.ly/3uyz11L