पावसात मोबाईल वर अंगणात व्हिडिओ शुट करत असताना विज पडली - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, मे ३१, २०२१

पावसात मोबाईल वर अंगणात व्हिडिओ शुट करत असताना विज पडली

 

💫 पावसात मोबाईल वर अंगणात व्हिडिओ शुट करत असताना विज पडली  💫

____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________
अवकाळी पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. पुण्यातील  पुरंदरमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.  घराच्या दारात पडणारा पाऊस मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत असताना अचानक झाडावर वीज  कोसळली आणि एकच गोंधळ उडाला. वीज पडल्यामुळे अनेक लोकांना विजेचे झटके सुद्धा बसले.
(फोटो)

ही घटना पुण्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात घडली. या गावात राहणारे संजय निगडे याच्या घरासमोर हा थरारक प्रकार घडला. पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हादायक झाले होते. त्यामुळे संजय निगडे हे घराच्या दारात उभं राहून बाहेर पडणार पाऊस मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होते.

(व्हिडिओ🖕)
पण अचानक भलामोठा आवाज झाला आणि दारातील झाडावर वीज कोसळली. अवघ्या काही सेंकदाचा हा थरार होता, पण अंगणातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने तुळशीवृंदावन आणि झाड भर पावसात जळत होते.
दैव बलवत्तर म्हणून कोणीही या दुर्घटनेत जखमी झाले नाही अथवा कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र परिसरातील लोकांना विजेचे झटके चांगलेच बसले. घरातील विजेचा झटका लागतो तसा झटका काही क्षण बसला होता.  हा सगळा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद जरी झाला असला तरी या घटनेमुळे निगडे यांनी मात्र चांगलाच धस्का घेतला आहे