दोन राज्यात विभागले गेलेले एक रेल्वे स्थानक
०९ मे २०२१
दोन राज्यात विभागले गेलेले एक रेल्वे स्थानक
दि. ९ मे २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3nYVUsF
भारत हा संघराज्य देश आहे,देशात अनेक राज्ये आहेत,पण या राज्य सीमा भौगोलिक स्वरूपात लागु होतीलच असे नाही.एक रेल्वे स्थानक असे आहे की, जे गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ह्या दोन्ही सीमांच्या हद्दीत असणारे हे एकमेव रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकावरील एक बाक असा आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, तर उर्वरित अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. ह्या बाकावर बसणाऱ्यांना, ते कुठल्या राज्यात बसले आहेत ह्याकडे लक्ष द्यावे लागते. इथे तिकीट खिडकी महाराष्ट्रामध्ये आहे, तर स्टेशन मास्तरांचे ऑफिस गुजरातमध्ये आहे. इतकेच नाही, तर ह्या स्टेशनवर अनाउन्समेंट चार निरनिराळ्या भाषांमध्ये होत असतात. ह्या स्टेशनचे नाव आहे ‘नवापुर’. _____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🥇
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _ጦඹիiᎢi
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
