तुर्कमेनिस्तान :या देशातील नागरिकांना सरकार पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत पुरवते !
. {दि. २६ मे २०२१}
तुर्कमेनिस्तान या देशातील लोक सुखी म्हटले पाहिजेत.पाणी, नैसर्गिक गॅस आणि वीज या तीन गोष्टी सरकार नागरिकांना मोफत देते. तुर्कमेनिस्तानहे जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त नैसर्गिक गॅसचे साठे असलेला देश आहे. तसेच या देशातील बहुतांश प्रदेश हा कराकुमच्या वाळवंटाने आच्छादलेला आहे. या देशाचे सरकार १९९३ पासून देशातील नागरिकांना मोफत पाणी, वीज आणि नैसर्गिक गॅस प्रदान करत आहे.
या देशाची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे, तुर्कमेनिस्तान मध्ये वाहन धारकांना दर महिन्याला १२० लिटर पेट्रोल मोफत देण्याची परवानगी आहे. या मर्यादेनंतर समजा कोणाला अधिकच्या पेट्रोलची गरज भासली तर त्याला अगदी नगण्य किंमतीत म्हणजेच प्रती लिटरमागे फक्त ०.२५ सेंट (अमेरिकन करन्सी) मध्ये पेट्रोल उपलब्ध होते. तुर्कमेनिस्तान मधील बहुतेक लोक गॅस स्टोव्ह बंद करत नाहीत, तर ते तसाच स्टोव्ह कमी उष्णतेवर चालू ठेवतात असे ऐकिवात आहे.कारण गॅस हा विनामूल्य असल्याने त्यांना काही फरक पडत नाहीत. त्यामुळे ते स्टोव्ह चालू करण्यासाठी काडीपेटी सुद्धा ते विकत घेत नाहीत. ही गोष्ट किती खरी हे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही.असो,

तुर्कमेनिस्तान मधील नागरिक बाहेर जाताना सुद्धा घरातील दिवे घालवत नाहीत, कारण बल्ब बंद केल्यानंतर परत चालू केल्यावर पूर्ण प्रकाशित होईपर्यंत सुमारे पाच ते दहा मिनटे लागतात. तसेही येथील नागरिकांना वीज मोफत मिळत असल्याने दिवे चालू ठेवून बाहेर जाण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही. तुर्कमेनिस्तान सरकारने अजून २०३० पर्यंत नागरिकांना पाणी,वीज आणि नैसर्गिक गॅस मोफत देण्याचे वचन दिले आहे.मुळात कमी लोकसंख्येचा देश इतका संपन्न आहे की येथील सरकारवर या गोष्टीचा ताण येत नाही.
______________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
💤 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव, जि. कोल्हापूर 💤
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _ጦඹիiᎢi