दरोडा टाकणारे पोलीसाच्या जाळ्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मे २०२१

दरोडा टाकणारे पोलीसाच्या जाळ्यात

दरोडयाची पूर्वतयारी करणारे चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात,
एक फरार ५३ हजार ६३० रुपयांचा मुद्धेमाल जप्त
नागपूर /अरुण कराळे (खबरबात)
पोलीस स्टेशन वाडी हद्दीत येणाऱ्या मलिबो रेस्टॉरेंट मोकळ्या जागेत रात्रीचा दरोडा टाकण्याची पूर्वतयारी तयारी करणाऱ्या चार आरोपींना वाडी पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यातील एक आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार शनिवार २९ मे रोजी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान आरोपी शुभम चरणदास मेंढे वय २६ रा. पालकर नगर वाडी,निलेश उर्फ छोटू ज्ञानेश्वर गवई वय २७ वर्ष रा. रामजी आंबेडकर नगर वाडी,सुरज उर्फ रघु सुभाष भलावी वय १९ रा. म्हाडा कॉलनी आठवा मैल, निखिल विजय कांबळे व फरार आरोपी रोशन नायडू आंबेडकर नगर आदींनी संगमत करून मलिबो रेस्टॉरेट मागील मोकळ्या जागेत शनिवारी स्वतःजवळ प्राणघातक शस्त्र बाळगून दरोड्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती वाडी पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात घटनास्थळी पंचासह दुय्यम पोलीस निरीक्षक भरत वऱ्हाडे,उपनिरीक्षक साजिद अहमद, पोलिस काँन्सटेबल सुनील मस्के,प्रमोद गिरी,पोलीस शिपाई प्रदीप,मुनींद्र,सतीश,ईश्वर राठोड,हेमराज बेरार,प्रमोद, शिवशंकर आदींनी धाड टाकून आरोपीकडून लोखंडी तलवार,मिरची पावडर,विवो कंपनीचा मोबाईल लोखंडी चाकू,लाकडी दांडा, नायलॉन दोरी,दुचाकी,लोखंडी रॉड व नगदी २५० असा एकूण ५० हजार ६३० रुपयांचा मुद्धेमाल जप्त केला.आरोपी विरोधात ३९९ , ४०२ नुसार गुन्हा दाखल करून वाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.