शक्तीवर्धक शतावरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ मे २०२१

शक्तीवर्धक शतावरी

 शक्तीवर्धक शतावरी 


फेसबुक लिंक http://bit.ly/3nL0zOK
शतावरी वनस्पतीच्या मुळ्या जास्त औषधी असतात. या मूळ्याचे चूर्ण, स्वरस, काढा औषधात वापरतात. शतावरी ही उत्तम शक्तीवर्धक आहे. एकूणच शरीराचे बल शतावरीने वाढते. अशक्तपणा, उत्साह न वाढणे, यावर शतावरीचे चूर्ण रोज दुधाबरोबर घ्यावे. त्यामुळे बलवृद्धी होऊन रोगप्रतिकार शक्तीही उत्तम वाढते. शरीरयष्टी बारीक असणे, वजन न वाढणे, यावर शतावरी चूर्ण घ्यावे.

शक्तीवर्धक शतावरी

        गर्भधारणेमध्ये मदत
नेक महिलांना इच्छा असूनही गर्भधारणा होत नाही. त्यांना शतावरी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक महिलेच्या मेनस्ट्रुअल सायकलमध्ये ओव्ह्युलेशनचा एक फेज असतो. त्यावेळी महिला गर्भधारण करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर गर्भ राहण्याची शक्यता असते. मात्र, अनेक महिला अशा असतात, की त्यांच्या दोन मासिक पाळींमध्ये ओव्ब्युलेशन पिरीयड्सच येत नाही. अशा महिलांना नियमित शतावरीचे सेवन केल्यास त्यांना गर्भधारणा होण्यास मदत होते.
शतावरीच्या सहाय्याने तेल, तूप सिध्द करतात. शतावरीच्या तेलाने मालीश केली असता वजन वाढते. शतावरी घृताचे नियमित सेवन केले असता बल प्राप्त होते. आम्लपित्त, घशाशी जळजळ, त्यामुळे पोटात दुखणे यावर शतावरी चूर्ण घ्यावे. तसेच अल्सरचा त्रास असल्यास शतावरी चूर्ण तुपातून घ्यावे. त्यामुळे पेप्टेक अल्सर बरा होण्यास मदत होते.,शतावरी कल्प तर प्रसिद्धच आहे. ज्या काही औषधांमुळे आयुर्वेद प्रत्येक घरात आहे त्यापैकी एक म्हणजे शतावरी कल्प. याचा मुख्य उपयोग हा सध्या प्रसुतीनंतर अंगावर नियमित व भरपूर दूध येण्यासाठी होत असला तरी तो सर्वांनी दुधाबरोबर शक्तीवर्धक म्हणून घावा. लहान मुलांनाही शक्तीवर्धक पेय म्हणून द्यावे. गर्भार अवस्थेपासून ते प्रसुतीनंतर ६ महिन्यांपर्यंत नियमित घावा.हल्ली अनेक कंपन्या शतावरी पावडर स्वरूपात उत्पादन करत आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
,9890875498