कोरोना रुग्णांच्या सु्विधा व लसीकरण मोहिमेवर भर द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ मे २०२१

कोरोना रुग्णांच्या सु्विधा व लसीकरण मोहिमेवर भर द्या

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर, २९ मे - ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तरी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

कोरोना रुग्णांसाठी असलेल्या सुविधा व लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मौदा, कुही या भागाचा पाहणी दौरा केला.

यावेळी आमदार अभिजीत वंजारी, आमदार टेकचंद सावरकर, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जि. प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, काँग्रेसचे नेते गज्जू यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. राऊत यांनी मौदा येथील तारसा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी कोरोना रुग्णांच्या संख्या तसेच त्यांच्या उपचारासाठी असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णांशी सुद्धा संवाद साधला व उपाययोजनांबाबत मते जाणून घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केद्रातील कोरोना लसीकरणाच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी तक्षशीला वाघधरे, तापेश्वर वैद्य, प्रमोद बरबटे, शकुर नागानी, ज्ञानेश्वर वानखेडे, नानाभाऊ कंभाले, शालिनीताई देशमुख, अशोक डहुरे, मनोज नौकरकर, बाळकृष्ण खंडाईत, शेषराव देशमुख, संदीप जैन आदी प्रकामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मौदा येथील ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा भेट दिली. ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली. कोरोना लसीकरणावर सर्व आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी भर द्यावा तसेच लसीकरणाबाबत लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांचे अनुभव कथन किंवा सोशल मिडीयाचा वापर करून लोकांमधील भीती, गैरसमज, अंधश्रद्धा दूर कराव्या, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
कोरोना तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तयारी करावी. यात लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष काळजी घ्यावी अश्या सूचनाही डॉ. राऊत यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.