शिराळा किल्ला
सह्याद्रीच्या मुशीत अन् मोरणा-वारणा नद्यांच्या कुशीत, पुरातन निसर्गरम्य म्हणून शिराळा गावाकडे पहिले जाते .गोरक्षनाथांच्या वास्तव्याने ते पुरातन ठरते. येथील नागपंचमी भारतात प्रसिद्ध आहे.तसेच भुईकोट किल्ल्याच्या साक्षीने ते ऐतिहासिक महत्व आहे.शिराळ्याचा उल्लेख इ.स .९००च्या पूर्वीपासून आढळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न फक्त शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर झाला. त्याचे नेतृत्व किल्लेदार पिलाजी देशमुख आणि दीक्षित यांनी केले होते पण त्यामध्ये ते अपयशी झाले. इतिहास शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९००च्या पूर्वीपासून आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोराक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच बत्तीस शिराळा. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498