Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

रविवार, मे २३, २०२१

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ऑनलाईन वैद्यकीय परिषदेस वाढता प्रतिसाद



राज्यातील 6 हजार बाल रोग तज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने केले मार्गदर्शन;

मुलांमधील कोविडशी संबंधित मानसिक दुष्परिणामांवर देखील चर्चा

-----------------

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नकावेळीच डॉक्टरला दाखवा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

 

          मुंबई दि. २३  : कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३००  बाल रोग तज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नकावेळीच डॉक्टरला दाखवाकोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. 

 

            विशेष म्हणजे हा कार्यक्रम बालरोग तज्ञांव्यतिरिक्त इतर संस्था व संघटनांमधील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स आणि हजारो सर्वसामान्य दर्शकांनी विविध माध्यमातून पाहिलाराज्य शासनाने बाल रोग तज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे  डॉ.सुहास प्रभू हे अध्यक्ष असून डॉ.विजय येवलेडॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. या तज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली.

 

             यावेळी अनेक बाल रोग तज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना टास्क फोर्सने उत्तरे दिली.  यावेळी मुख्य टास्क फोर्सचे  डॉ संजय ओकडॉ शशांक जोशी,डॉ तात्याराव लहाने यांनी देखील यावेळी सूचना केल्या.   

 

मी केवळ निमित्तमात्रहे तुमचे यश

 

            यावेळी बोलताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कीकोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्सआरोग्य यंत्रणासरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोकसर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहेमी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे.   

 

            कोरोना विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करूनएकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की,  माझे कुटुंबमाझी जबाबदारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत, पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत  ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करा

 

            कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले कीगेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्याकाय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे योग्य मार्गदर्शन करावे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या. 

 

            दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाऊले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीलसीकरणाच्या बाबतीतही १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे. पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला खात्री आहेजून नंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील  सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरु करू शकू.

 

उपचारांबाबत अनेक शंकांचे समाधान

 

            सुरुवातीला टास्क फोर्सने सादरीकरण केले. कोविडग्रस्त मुलांना स्तनपानअंगणवाडी सेविकांची भूमिकायावेळी त्यांनी मुलांमध्ये सौम्यमध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग कसा ओळखावासीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नयेमुलांमध्ये सहव्याधी फारशा नसतात पण ज्यांच्यात आहेत त्याना कसे उपचार करावेतकोविडग्रस्त मुलांची काळजी घेताना पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावीमास्कहात धूत राहणे ही काळजी कशी घ्यावीघरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविडग्रस्त मुलांपासून कसे दूर ठेवावे, कोविडमुळे मुलांमधील फुफ्फुसाचा संसर्गमधुमेही टाईप एक मुलांच्या बाबतीत उपचारमुलांसाठी ६ मिनिटे वॉक टेस्ट कशी करावीघरी विलगीकरणातील मुलांच्या उपचाराचा प्रोटोकॉल कसा असावाअशा मुलांना कोविड काळजी केंद्रात घेऊन जाण्याची नेमकी परिस्थिती कशी ओळखायचीकोविडमधील मुलांना खाण्यापिण्याची काय पथ्ये असावीतअशा मुलांना बीसीजी व इतर लसींच्या बाबतीत काय करावेमुलांमध्ये म्युकरमायकोसीसची किती शक्यता असते, मुलांमध्ये हायपोक्सिया होतो कामुलांना नेमकी कोणती लस द्यावीलहान मुलांना मास्क घालावा किंवा नाही याबात तज्ञांनी मार्गदर्शन केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.