किल्ले देवगिरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ मे २०२१

किल्ले देवगिरी

   किल्ले देवगिरी 


फेसबुक लिंक http://bit.ly/3ud7PFn
अौरंगाबाद पासुन साधारण १८ किमी अंतरावर  दौलताबाद किल्ला आहे.कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला.देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ला हा ई. सन ११८७ मध्ये यादव राजा भिल्लमा यांनी बांधला होता.पुढे त्याचा वंशज रामचंद्र याने १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास तोंड देऊ शकला नाही. व किल्ला खिलजीच्या ताब्यात गेला.१३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा मुहम्मद या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला किल्ला पाहता दौलताबाद हा किल्ला सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या टेकडीवर बांधलेला आहे. संरक्षण यंत्रणेला तीन तटस्थ भिंती आहेत ज्यात नियमित अंतराने दरवाजे आणि किल्ले आहेत. संपूर्ण किल्ला संकुलाचे क्षेत्रफळ अंदाजे ९४.८३ हेक्टर आहे.
या किल्ल्यात पायरी विहीर, बरदरी, जलाशय, मीनार, हम्मम, विविध वाड्या, मंदिरे आणि मशिदी यासारख्या १० अधूरी खडकांच्या कापाच्या गुहेशिवाय इतर वास्तू आहेत.किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले. सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘कालाकोट’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या.

किल्ले देवगिरी

गडावर काय पहाल
चांद मिनार-इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजयाप्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्याचे बांधकाम इराणी पध्दतीचे आहे. आत मधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके सुध्दा आहेत.
भारतमाता मंदिर :
हत्ती हौदाच्या मागील बाजूस एक मोठी वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने आहेत. या मंदिराच्या आत शिरल्यावरच त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते.किल्ल्यात आत प्रचंड मोठा दगडी हौद आहे. शत्रूसैन्याचा वेढा पडलाच तर हा हौद पाण्याची गरज पुरी करत असे. शिवाय अनेक तोफा आहेत त्यातील पंचधातूची व १२ किमीचा मारा करू शकणारी मेंढा तोफ आवर्जून पाहावी. वर टेकडीवर महाल असून बारादारी असे त्याचे नांव आहे. म्हणजे बारा दरवाजे असलेला महाल. त्या काळच्या करमणुकीसाठी म्हणजे नृत्य, संगीतसभांसाठी मोठा हॉल आणि आजूबाजूचे सुंदर दृष्य न्याहाळण्यासाठी असलेले सुंदर सज्जे या महालाची शोभा अजून वाढवितात.राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला असा इतिहास आहे.

शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
एकदा तरी किल्लाला आवर्जून भेट दयावी
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
9890875498
_________________________