गोंडखैरी रिलायन्सच्यावतीने मोफत डिझेल सुविधा उपलब्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मे २०२१

गोंडखैरी रिलायन्सच्यावतीने मोफत डिझेल सुविधा उपलब्ध

गोंडखैरी रिलायन्सच्यावतीने मोफत डिझेल सुविधा उपलब्ध
रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनाला मिळणार दररोज ५० लीटर डिझेल
सभापती भारती पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केली उपक्रमाची सुरवात
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
कोरोनाबाधित रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स बी.पी. मोबिलिटी कंपनीच्यावतीने दररोज ५० लीटरपर्यंत डिझेल मोफत देण्यात येणार असल्याची माहीती गोंडखैरी रिलायन्स पंपाचे संचालक कमलेश सिंग चव्हाण यांनी दिली. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गोंडखैरी नजिकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर प्रत्येक रुग्णवाहीकेला ५० लिटर डिझेल मोफत देऊन सभापती भारती पाटील यांनी गुरुवार २० मे रोजी हिरवी झेंडी दाखवून या स्त्युत्य उपक्रमाची सुरवात केली.
नागपूर जिल्ह्यातील रिलायन्सच्या सर्व पेट्रोल पंपावर सोमवार १७ मे पासून हा उपक्रम राबविण्यात आला असून जिल्हा प्रशासन अथवा जिल्हाआरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र घेऊन येणाऱ्या नोंदणीकृत खासगी अथवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत १२ रुग्णवाहिकेत ५० लिटर मोफत डिझेल देण्यात आल्याची माहिती गोंडखैरी रिलायन्स पम्पांचे संचालक कमलेश सिंग चव्हाण यांनी दिली.
यावेळी जि.प. शिक्षण सभापती भारती पाटील, पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता उराडे, डॉ. सत्यवान वैद्य, आरोग्य सेविका कुंदा सहारे, सरपंच तुषार चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नागपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप ठाकरे , सामाजिक कार्यकर्ते सुनील कापसे, राजेश रोडे, तूषार सरोदे, अमीत कंडे, आशिष कोल्हे, रामकृष्ण टापरे आदींच्या संखेत रुग्णवाहिका व चालक उपस्थित होते.