वडधामना शिवारात जुगार अड्डयावर धाड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ मे २०२१

वडधामना शिवारात जुगार अड्डयावर धाड

वडधामना शिवारात जुगार अड्डयावर धाड
४ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्धेमालासह पाच आरोपींना अटक, चार आरोपी फरार
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात)
वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडधामना शिवारात गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली असता वाडी पोलिसांनी धाड टाकून घटनास्थळावरून पाच आरोपींना ताब्यात घेतले तर इतर पळून गेले. प्राप्त पोलीस माहितीनुसार सोमवार १७ मे रोजी वडधामना परिसरातील नागलवाडी येथील नाल्याजवळील मोकळ्या जागेत ताश पत्यावर पैशाची बाजी लावून हार जीत जुगार सुरू असल्याची माहिती वाडी पोलिसांना मिळताच वरिष्ठ अधिकारी व ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे,नापोशी सुनील नट,रवींद्र सातोकर,धर्मेंद्र यादव,रितेश,प्रवीण फलके,फहीम खान या पथकाने रेड कारवाही करून आरोपी अभिषेक उर्फ सनी राजेश वऱ्हाडपांडे वय २४ रा. कंट्रोलवाडी, प्रशांत मनोहर पाटील वय ३६ रा. डोबीनगर वडधामना,भावेशकुमार विश्वनाथ बघेल वय २४ रा. वैभवनगर वाडी, सचिन मोहन सोमकुवर वय २५ रा. हिलटॉप कॉलनी आठवा मैल, आदित्य उर्फ डोमा शेषराव राऊत वय २१ रा. स्मृती ले- आउट दत्तवाडी या पाच आरोपीना अटक केली तर घटनास्थळावरून मोहन खर्जे, जितू यादव,आकाश गंधारे,दिनेश मालूरे आदी फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून आठ दुचाकी वाहन,नगद ४५ हजार रुपये, चार मोबाईल, ५२ ताश पत्ते असा एकूण ४ लाख ३१ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींच्या विरोधात कलम १८५ / २०२१ कलम १२ सहकलम १८८, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या आरोपींचा वाडी पोलीस शोध घेत आहे.