रिक्षावाल्याला अद्दल घडली: धावत्या रिक्षातून कुत्र्याला लाथ मारत होता,रिक्षाच पलटी झाली
पिंपरी शहरतील शगुण चौकात शनिवारी दुपारी ही घटना घडली. रिक्षा दुभाजक ओलांडून पलीकडे गेल्याने पोलिसांनाही हा अपघात नेमका कसा झाला याची उत्सुकता होती. सीसीटीव्ही तपासण्यात आलं असता रिक्षातून भरधाव वेगाने येत असताना चालकाने कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.
अपघात इतका भीषण होता की, चालक रिक्षातून फेकला गेला आणि तोंडावर आपटला. तर दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी समोरुन येणाऱ्या एका कारला वेळीच रोखलं. मात्र या घटनेमुळे चालकाला जन्माची अद्धल घडली