तुम्ही जे आवडीने चॉकलेट खाता त्यामुळे माकडाची प्रजात नष्ट होणार आहे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ मे २०२१

तुम्ही जे आवडीने चॉकलेट खाता त्यामुळे माकडाची प्रजात नष्ट होणार आहे

तुम्ही जे आवडीने चॉकलेट खाता त्यामुळे माकडाची प्रजात नष्ट होणार आहे 


चॉकलेट,कॅडबरी कोणाला आवडत नाही,लहानापासून मोठ्या पर्यन्त ते आवडीने खातात,एवढेच कशाला रूसलेली प्रेयसीला एखादा प्रियकर कॅडबरी खायला घालुन आपल्या प्रेयसीची मर्जी राखतो.पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या चॉकलेट कॅडबरी खाण्याने माकडाची एक प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ते.चॉकलेट कॅडबरी तयार करताना त्यातील मुख्य घटक म्हणजे पामतेल.हे पामतेल इंडोनेशियातुन आयात केले जाते.इंडोनिशियात पामतेलाचे भरपुर उत्पादन घेतले जाते.इंडोनेशियातून पाल्म तेलाची जगभर निर्यात केली जाते. भारत हा या पाल्म तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे.हे पाल्म तेल इंडोनेशियाच्या ज्या भागातून तयार करून आयात केलं जातं तो भाग इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या उत्तरेला असलेल्या रावा सिंगकिल वाईल्ड लाईफ रिझर्व्ह मध्ये घनदाट अरण्यात येतो.  याठिकाणी  ओरांगउटान यांचा मोठा अधिवास आहे.हा "ओरांगउटान" या माकडांच्या दुर्मिळ प्रजातीचं या भागात भरपुर वस्ती आहे.
या पाम तेलाच्या उद्योगामुळे आता त्या प्रजातीची अख्खी वसाहत असलेलं जंगल धोक्यात आले आहे.त्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून ते पामचे वृक्षारोपण करत असून यामुळे ओरांगउटान या प्रजातीचा अधिवास धोक्यात आला आहे. त्या भागात ओरांगउटानची मोठी संख्या आहे.

तुम्ही जे आवडीने चॉकलेट खाता त्यामुळे माकडाची प्रजात नष्ट होणार आहे

मागील काही वर्षांत रावा सिंगकिल वाईल्ड लाईफ रिझर्व्हमधील ३००० हुन जास्त हेक्टर जमिनीला साफ करण्यात आलं असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाल्म वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.हे असेच चालू राहिले तर ओरांगउटान माकडाच्या अस्तित्वावर घाला येऊ शकतो.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498