ऑक्सिजन सिलिंडर नेणारे पिकअप उलटली; गाडीखाली दबल्याने एकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ मे २०२१

ऑक्सिजन सिलिंडर नेणारे पिकअप उलटली; गाडीखाली दबल्याने एकाचा मृत्यू


 

#चंद्रपूर येथील एम.आय.डी.सी ऑक्सिजन प्लान्ट मधून पिकअप वाहनाने ४४ सिलेंडर ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना ब्रम्हापुरी-नागभीड वाटेवर पाहाटेच्या सुमारास वाहनासमोर अचानक रानटी डुक्कर आल्याने वाहनास जोरदार धडक बसून वाहन पलटी झाले. यात मागील बाजूस दोन जण बसले होते. यातील एक गाडीखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक या अपघातात जखमी झाले आहे.