कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये आता १२ ते १६ आठवडे अंतर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०२१

कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये आता १२ ते १६ आठवडे अंतर

 


कोरोनाचा दुसरा डोस कधी घ्यावा याबाबत असलेला संभ्रम आज दूर झाला. लसीकरणासंबंधी केंद्र सरकारनं नेमलेल्या पॅनेलनं सर्वच शंकांना उत्तर मिळतील अशा शिफारसी केल्यात. नॅशनल टेक्निकल अडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGIनं या शिफारशी केल्यात.  

1) कोविशील्डची लस घेतलेल्यांनी दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनंतरच घ्यावा म्हणजे तीन ते चार महिन्यांचे अंतर ठेवावे असं या पॅनलनं सुचवलंय. सध्या हे अंतर चार ते आठ आठवडे म्हणजे एक ते दोन महिने इतकं आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं ही कोविशील्ड लस बनवली आहे.

2) जे रुग्ण कोरोनातून बरे झालेयत त्यांनी सहा महिने कोणतीही लस घेऊ नये असं या पॅनेलनं सुचवलंय.

3) गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर कोविशील्ड किंवा कोवॅक्सिन अशी कोणतीही लस घ्यावी, त्यात काहीही धोका नाही असं या पॅनेलनं म्हंटलंय.

4) स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस घ्यायला या पॅनलनं आपल्या शिफारशींत हिरवा कंदील दाखवलाय.

कोवॅक्सिनच्या दोन डोसमधलं अंतर मात्र सध्या जेवढे आहे तेवढंच म्हणजे चार ते आठ आठवडे इतकंच आहे. भारतात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोनच लसी दिल्या जातायत आणि देशभर 18 कोटी लोकांना या लसी देण्यात आल्यात. केंद्र सरकारनंही राज्यांना दिलेल्या सूचनांमध्ये दोन डोसमधले अंतर चार ते सहा आठवडे आणि चार ते आठ आठवडे ठेवा असं सांगितलं होतं.