45 लाख पन्नास हजाराचा दारूसाठा जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


०३ मे २०२१

45 लाख पन्नास हजाराचा दारूसाठा जप्त

 ◼️ देशी दारू सह गावठी दारू साठा जप्त 

 

◼️45 लाख पन्नास हजाराचा दारूसाठा जप्त, भद्रावती पोलिसांची कार्यवाही.



 शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)  : 

पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत नाका-बंदी दरम्यान देशी दारूसाठा जप्त केला. तर बरांज तांडा येथील गावठी दारू साठा पोलिसांनी उध्वस्त केला. यातील 45 लाखाचा मुद्देमाल जप्त केली ही कारवाई रविवारला करण्यात आली.

        श्रीकांत रमेश समर्थ वय 22 वर्ष राहणार नागपूर असे आरोपीचे नाव आहे. हा एम एच 31 इक्यू  0 534  या चार चाकी वाहनाने  नागपूरहून देशी दारू साठा आनत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे एनटीपीसी परिसरात नाकाबंदी केली असता ती नाकाबंदी पाहून आरोपीने वाहन घेऊन जागेवरून पळ काढला पोलिसांनी पाठलाग करून त्या आरोपीला अटक केली त्याच्या वाहनात असलेले देशी दारू किंमत  2 लाख 50 हजाराचा दारूसाठा जप्त केला व वाहन ताब्यात घेतले.

      तर दुसऱ्या कारवाईत  बराच तांडा परिसरात  हातभट्टीची दारु काढत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलिसांनी धाड टाकून  गुळाची दारू व साहित्य असा 42 लाखाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला यातील आरोपी घटनास्थळावरून पसार झाले  ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे ,निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.