आईने हाकलून लावलेल्या अल्पवयीन मुलाला पोलीस शिपायाने दिला आसरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०२१

आईने हाकलून लावलेल्या अल्पवयीन मुलाला पोलीस शिपायाने दिला आसरा

 शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) -  

जन्मदात्या मातेने स्वतःच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला संचारबंदीच्या काळात काही काम धंदा करीत नाही म्हणून घरून हाकलून दिल्याने दुखी झालेल्या त्या मुलाने आपली आपबीती सांगितल्यानंतर भद्रावती येथील पोलीस शिपाई शशांक बद्दामवार यांनी त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून आसरा दिला आहे.

 रितिक दिनेश पाटील वय सोळा वर्ष राहणार अकबरपुर (यूपी ) असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे रात्र दरम्यान पोलीस शिपाई शशांक बद्दामवार हे गस्तीवर असताना त्यांना बस स्थानक परिसरात रितिक रडत असल्याचे दिसले त्यांनी त्याचे जवळ जाऊन  विचारणा केली तू कुठला आहे काय बरं रडत आहे तो सांगण्याच्या मनस्थिती नव्हता परंतु त्याला वारंनवार विचारणा केली असता प्रथम त्याने  मला भूक लागली असल्याचे सांगितले त्यानंतर त्याला जेवण दिल्यानंतर त्याने आपली आपबीती सांगितली.

त्याच्या आईचे माहेर भद्रावती असून ती फुकट नगर परिसरात वास्तव्यात आहे त्याच्या आईचे लग्न यूपी येथे झाले दोन वर्षे ती सासरी राहिल्यानंतर दोन वर्षाच्या मुलाला सोडून ती भद्रावती येथे परत आली वडील व्यसनी असल्याने रितीक चा सांभाळ वडीलाच्या आईने केला त्यानंतर त्याला समज आल्यानंतर तब्बल सोळा वर्षानंतर तो आईचा शोध घेत भद्रावतीत आला मात्र इकडे त्याच्या आईने दुसरे लग्न केले होते. रितिक ला काही दिवस स्वतःजवळ ठेवल्या नंतर त्याच्या आईने चालू असलेल्या संचारबंदी मध्ये काम धंदा का करत नाही, तुला फुकट पोसणार नाही असे म्हणून त्याला घरातून हाकलून लावले. त्याने बस स्थानक गाठून उपाशी पोटी एक दिवस काढला. मात्र हा प्रकार पोलीस शिपाई शशांक बद्दामवार यांना कळताच त्यानी स्वखर्चाने या मुलाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याने त्या निरागस मुलाच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत आहे बद्दामवार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.