अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करावे. - तहसीलदार विनोद मेश्राम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मे २०२१

अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करावे. - तहसीलदार विनोद मेश्राम

अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करावे. - तहसीलदार विनोद मेश्राम


तालुक्यात 910 डोस उपलब्ध

 सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण सुरूसंजीव बडोले, प्रतिनिधी .


नवेगावबांध दि.7 मे:-

सध्या covid-19 ची दुसरी लाट सुरू आहे. तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. असे असताना तालुक्यातील सर्व लसीकरणासाठी पात्र नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन स्वतःचे लसीकरण करून घ्या.लस घेतल्यावर आरोग्याला कुठलाही धोका नाही, कुणीही लस घेऊन मरत नाही, असल्या अफवांवर व गैरसमजुती वर विश्वास न ठेवता, तालुक्यातील लसीकरण कार्याला सहकार्य करावे. तसेच स्वतःला, आपल्या कुटुंबियांना, व तालुक्याला कोरोना संसर्गापासून दूर ठेवावे. असे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी तालुक्‍यातील जनतेला केले आहे. आपल्या तालुक्यात 910 इतके लसीकरण डोस मिळाले आहेत. तालुक्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र व उपकेंद्र,तसेच नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून, लसीकरण कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात आरोग्यवर्धिनी केंद्र कोरंबीटोला अंतर्गत उपकेंद्र येगाव 100 डोस, बुधेवाडा 50 डोस, धाबेपवनी अंतर्गत उपकेंद्र धाबेपवनी 100 डोस, उपकेंद्र नवेगावबांध 100 डोस, चान्ना बाकटी अंतर्गत उपकेंद्र चान्ना 50 डोस, भिवखिडकी 50, केसोरी अंतर्गत केसोरी 100, चिचोली 100, गोठणगाव अंतर्गत केंद्र गोठणगाव 50, उपकेंद्र बाराभाटी 50, आरोग्य वर्धिनी केंद्र महागाव अंतर्गत इटखेडा 80, माहूरकुडा 80 डोस ची व्यवस्था आज 7 मे पासून करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे कार्य सुरू आहे. ज्या नागरिकांना कोविड लस लावायचे आहे. त्यांनी 1 दिवसापूर्वी सायंकाळी सहा वाजेनंतर दुसऱ्या दिवसाकरीता 1 दिवसापूर्वी ऑनलाईन   अपॉइंटमेंट    घेणे आवश्यक आहे. यासाठी कोविड कार्य पथकातील सदस्य, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा किंवाhttp://www.selfregistration.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी व नंतर अपॉइंटमेंट शेडूल करावे.केशोरी आदिवासी व दुर्गम भागातील लसीकरण केंद्रांवर त्यांनी आज सात मेला भेट देऊन लसीकरण कार्याची माहिती जाणून घेतलीनियमित लसिकरणा बरोबरच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर आता अधिक भर दिला जात आहे.

लस घेतल्याने कोरोना च्या गंभीर अवस्थे पासून आपण दूर राहतो,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची गरज भासत नाही,आपण एकदम सुरक्षित राहतो,त्यामुळे तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व तालुका प्रशासनाला सहकार्य करावे.असे कळकळीचे आवाहनही तहसीलदार विनोद मेश्राम यांनी केले आहे.