गणराज ट्रॅव्हल्स चे संचालक श्री अनिल महाराज त्रिवेदी यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


०५ मे २०२१

गणराज ट्रॅव्हल्स चे संचालक श्री अनिल महाराज त्रिवेदी यांचे निधन


गणराज ट्रॅव्हल्स चे संचालक श्री अनिल महाराज त्रिवेदी यांचे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
चंद्रपूर - चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष धन्नू महाराज यांचे सुपुत्र व गणराज ट्रॅव्हल्सचे संचालक अनिल महाराज त्रिवेदी यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. गत काही दिवसापासून त्यांच्यावर चंद्रपूर रामनगर येथे उपचार सुरु होते. पण ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत असल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. त्यातच उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. अनिल महाराज हे चंद्रपूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य पदी सुद्धा होते.