एम्टा कामगारांकडून एम्टा खाणीचे काम बंद पाडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ मे २०२१

एम्टा कामगारांकडून एम्टा खाणीचे काम बंद पाडले
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती जवळ काही महिन्यापूर्वी चालू झालेल्या Emta खान पूर्णता एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसत आहे.
आणि अशाच वादामुळे काल emta कामगारांची खाणीचे काम कामगारांचे शोषण होत असल्याच्या कारणामुळे काम बंद पाडले. सहा महिन्यापूर्वी स्थानिक गावकरी, कामगार काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे व या ना. विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात MOE तयार करून बंद पडलेल्या emta खाणी चे काम स्थानिकांना रोजगार व पुनर्वसन या मुद्द्यावरून चालू करून दिले गेले होते. परंतु काही दिवस जाताच कंपनीकडून कामगार व गावकरी विरोधी धोरण चालू केले. स्थानिक कामगार गावकरी व कंपनीमध्ये रोजगार जोईनिंग लेटर, नवीन वेतन श्रेणी व अन्य पुनर्वसन मुद्द्यावरून संघर्ष पेटायला लागला. कंपनीकडून वरील लिखित स्वरूपात झालेल्या MOE या बगल देण्याचे काम सुरू केले व कोळसा उत्पादनामध्ये खूश झालेले कंपनी अन्यायकारी पद्धतीने कामगार गावकरी यांच्या विरोधात वागू लागली. स्थानिक रोजगार देण्याच्या पार्श्वभूमीवर चालू झालेली ही खान आतापर्यंत एकही नवीन रोजगार न देता उडिसा येथील 228 लोकांना भरती करून घेतले. आणि वादाची ठिणगी उभी झाली व कामगारांनी काम बंद पाडली.

 जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांनी या प्रकारची दखल घेत पुन्हा एकदा प्रशासनाला धारेवर धरले व आठ दिवसाचा आत रोजगार पुनर्वसन कामगार समस्या सोडवण्यासाठी कंपनीला ताकीद दिली अन्यथा खाण्याचे काम ट्रान्सपोर्ट बंद करू बंद पाडू असा इशारा सुद्धा देण्यात आला.

  अशा वादात सापडलेल्या कंपनी विरोधात सर्व कामगार एक झाले व गावकरी सुद्धा आणि खाणीतील ब्लास्टिंग च्या धक्क्यामुळे संतप्त झाले. यासंदर्भात तात्काळ तालुका प्रशासनामार्फत मा. तहसीलदार भद्रावती यांनी बैठक बोलावून येत्या चार-पाच दिवसात कंपनीला निर्णय घ्यायला सूचना दिल्या या बैठकीत खान कामगार प्रतिनिधी श्री नितीन चालखुरे,  प्रदीप मानकर अमरदीप म्हशाखेत्री, रवी डांगे,  प्रभाकर कुडमेते, धीरज पुनवटकर व ठाणेदार श्री पवार साहेब आदी उपस्थित होते.