अल्ट्राटेक सीमेंटतर्फे १५ आँक्सीजन कान्सनट्रेशन मशीन जिल्हाधिकारी यांना भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ मे २०२१

अल्ट्राटेक सीमेंटतर्फे १५ आँक्सीजन कान्सनट्रेशन मशीन जिल्हाधिकारी यांना भेट

 आवाळपूर :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बघता व खासकरून सभोवतालील गावाची परिस्थिती लक्षात घेता,अल्ट्राटेक सिमेंट चे सी ओ ओ राजेंद्र काब्राजी यांच्या मार्गदर्शनाने व एकाई प्रमुख विजय एकरे आणि उदय पवार यांच्या अथक प्रयत्नाने अल्ट्राटेक सिमेंट च्या सी एस आर ने पुढाकार घेत १५ आँक्सीजन कान्सनट्रेशन मशीन, माननीय जिल्हाधिकारी, अजय गुल्हाने व उपविभागीय अधिकारी राजुरा संपत खलाटे यांना भेट दिले.

 यावेळेस अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपाध्यक्ष, संजय शर्मा, देवेंद्र सिंग, कर्नल दिपक डे, दिपक शर्मा, सतीश मिश्रा, व सचिन गोवारदीपे उपस्थित होते.

 अल्ट्राटेक प्रबंधन यांनी जिल्हा अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांन आश्वासन दिले की, या कोरोना महामारीचा सामना करण्याकरिता सभोतालच्या गावातील लोकांना सहाय्य करण्याकरिता आम्ही नेहमी तयार असु तसेच सांगितले की तुमच्याकडून दिलेल्या सूचनाचे आम्ही वेळो-वेळी पालन करू व आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना पासून बचाव करण्याकरिता काळजी घेऊ.