वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० मे २०२१

वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या

 

कारंजा,(घाडगे) : 
आर्वीी मतदारसंघाच्या तीनही तालुक्यातील रुग्णालयाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तिसऱ्या लाटेसाठी पूर्व तयारी करण्यासाठी आज पाहणी केली.

कारंजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जुनी इमारतसह, ट्रामा केअर इमारत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी उपयोगात घ्या असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत व ट्रामा केअर इमारत खाली असल्याने येथेच चांगल्याप्रकारे १०० खाटाचे कोविड सेंटर सुरू करता येणार आहे. येथे तशी जागा उपलब्ध आहे. आणि आष्टी व कारंजासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बाजूला ऑक्सिजन प्लॅन्ट तयार करू असे यावेळी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. ट्रामा केअर इमारतीला लिफ्ट नसल्याने त्वरीत मागणी करा तात्काळ लिफ्ट लावण्यात येणार असेही यावेळी सांगण्यात आले.रुग्णाच्या सोयीसाठी लवकरात लवकर सूरु केलं तर नागरिकांना त्याचा फायदा होईल. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार , मुख्याधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक , तहसीलदार सचिन कुमावत , गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रभाकर वंजारी ,डॉ .महेंद्र घागरे, डॉ राजेंद्र कोटेवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

प्रशांत धारपूरेच जिल्हाधिकारीनी केलं कौतुक
ग्रामीण रुग्णालयात मोठमोठ्या इमारत असताना येथे जनरेटर उपलब्ध नसल्याने तालुक्यातील राजनी येथील ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापक असलेला प्रशांत उत्तम धारपूरे याने ५ लाख ४० हजार किंमतीचे ६२.५ केव्हीचे जनरेटर व पाच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले याची आज जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाहणी केली यावेळी या युवकाचा कौतुक करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात भेट दिलेल्या वॉटर प्लॅन्टच उद्घाटन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संघाकडून ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी पैसा गोळा करून दोन लाख 50 हजाराचे वॉटर प्लॅन्ट लावण्यात आले याचे आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उद्घाटन केले. यावेळी शिक्षक संघ उपस्थित होते.