आमदार किशोर जोरगेवार यांची श्री उज्वल गोरक्षण संस्थानला भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ मे २०२१

आमदार किशोर जोरगेवार यांची श्री उज्वल गोरक्षण संस्थानला भेट


चंद्रपूर(खबरबात):
आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी लोहारा येथील श्री उज्वल गोरक्षण संस्थानाला भेट देत येथील गोरक्षकांच्या कामाचे कौतूक केले. तसेच यावेळी येथील पदाधिका-यांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. हे संस्थान चालविण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. यावेळी श्री उज्वल गोरक्षन संस्थानचे सचिव कमलकिशोर राठी, हिम्मतभाई शाहा, रितेश बजाज, दिपक दगळी, प्रा. जुगलकिशोर सोमाणी, श्यामलाल बजाज, हेमंत बुदन, मेहुल सचदे, अॅड. आशिष मुथंडा, अॅड भूषण वांढरे, किरण चालखूरे, आनंद देशपांडे आदिंची उपस्थिती होती.

लोहारा येथे 1994 पासून श्री उज्वल गोरक्षण संस्थान चालविल्या जात आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर संस्थानला भेट देत संस्थानच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संस्थानच्या पदाधिका-यांशीही चर्चा करत माहिती जाणून घेतली. येथे सुरु असलेले काम कौतुकास्पद असून गौरक्षणात या संस्थानचे मोठे योगदान असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, गोमाता यांचा चारा उगवण्यासाठी 10 एकर शेतजमीन देण्यात यावी, येथील गोमातांची प्रकृती तपासणी करण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस डाॅक्टर उपलब्ध करुन देण्यात यावे, सदर संस्थानामध्ये शेड तयार करण्यात यावा, आदि मागण्या यावेळी संस्थानच्या वतीने आ. किशोर जोरगेवार यांना करण्यात आल्या आहे. या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस डाॅक्टर उपलब्ध करुन देण्याकरीता आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांसह दुरध्वनीवरुन चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच येथे डाॅक्टर उपलब्घ करुन दिल्या जाणार आहे.