चंद्रपूर : फडणवीस सरकारनं लावलेली दारुबंदी महाविकास आघाडी सरकारनं उठवली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ मे २०२१

चंद्रपूर : फडणवीस सरकारनं लावलेली दारुबंदी महाविकास आघाडी सरकारनं उठवलीचंद्रपूर :अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार पालकमंत्री झाल्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त निवेदनं दारूबंदी उठवण्यासाठी आली होती, तर 33 हजार निवेदनं ही बंदी कायम ठेवण्यासाठी आली होती.
त्यानंतर राज्य सरकारनं सनदी अधिकारी श्री झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. या समितीने परिस्थितीची समिक्षा केली आणि त्यांचा अहवाल दिला. अवैध दारू विक्री प्रकरणी 4042 महिला आणि 322 लहान मुलांवर गुन्हे दाखल झालेत.

चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर मागील 6 वर्षांत (फेब्रुवारी-2021 पर्यंत) तब्बल 118 कोटी 31 लाख 99 हजार 438 रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली. 47 हजार 362 दारूतस्करांना अटक केली.