चंद्रपुरात रक्तदान शिबिराचे आयोजन; एक हात मदतीचा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०५ मे २०२१

चंद्रपुरात रक्तदान शिबिराचे आयोजन; एक हात मदतीचा


चंद्रपूर/खबरबात:
संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा रक्त तुडवडा भरून काढून देशसेवेसाठी चंद्रपूर शहरातील भिवापुर वॉर्ड परिसरातील फ्रेंड सायबर कॅफे मित्र मंडळ परिवारांनी एकत्र येऊन करून काळात रक्ताची गरज लक्षात घेऊन 6 मे 2021 गुरुवारला भिवापुर वॉर्ड परिसरातील माचीस फॅक्टरी ग्राउंड परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे रक्तदान करणा-यांची संख्या घटली असून त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भिवापुर वॉर्ड परिसरातील युवकांनी एकत्र येत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव ठेवत प्रत्येकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे यासाठी नाव नोंदणी देखील खालील नंबर वर करण्यात येणार आहे.