धक्कादायक:चंद्रपुरात आढळले म्युकोर मायकॉसिसचे(ब्लॅक फंगसचे)10 रूग्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मे २०२१

धक्कादायक:चंद्रपुरात आढळले म्युकोर मायकॉसिसचे(ब्लॅक फंगसचे)10 रूग्ण

Google file


चंद्रपूर/खबरबात:
कोरोनाच्या संकटात 'म्यूकॉरमायकॉसिस' या आजाराची भर पडल्याने वैद्यकीय क्षेत्रापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांनाच आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. चंद्रपूरातही या बिमारीचे तब्बल 10 रुग्ण आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
'म्यूकॉरमायकॉसिस' हा जुनाच आजार असला तरी अलिकडच्या काळात त्याचा प्रकोप वाढला आहे.
कोराना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे रूग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे."
कोरोनारुग्णांची उपचारादरम्यान कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती,कोव्हिड रुग्णांना दिले जाणारे स्टीरॉईड्ज शरीरातील व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध,यात"कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो,

म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो,संसर्ग शरारातील मेंदू आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचला. तर, रुग्णाला मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पॅरालिसिस किंवा मृत्यू होण्याची भीती असते,ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.

नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत आहे. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच चंद्रपुरात देखील कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला आता म्युकोर मायकॉसिस हा रोग होऊ लागले आहे. आणि शहरातील विविध दवाखान्यात याचे दहा रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आता आणखी काळजी घेणे गरजेचे आहे.