अपंग महिलेच्या भाजीपाल्याची नासधूस करणे नागपूर पोलिसाला पडले महागात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मे २०२१

अपंग महिलेच्या भाजीपाल्याची नासधूस करणे नागपूर पोलिसाला पडले महागात


पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई

💥 नागपुरात भाजी फेकणाऱ्या 'त्या' पीएसायच्या दोन वेतनवाढ रद्द.
नागपूर/खबरबात:
मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर नागपुरातील जरीपटका भागातील एक व्हिडिओ व्हायरल होत होता.त्यात एका अपंग भाजी विकणाऱ्या महिलेचा भाजीपाला जरीपटका पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक यांनी रस्त्यावर फेकत संपूर्ण भाजीपाल्याची नासधूस केली होती.हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणि माध्यमांचा वार्याच्या वेगाने पसरू लागला.त्यानंतर नागपूर पोलिसांनी वर प्रश्न निर्माण होऊ लागले.आणि नागपूर पोलिसांची प्रतिमा मलीन झाली.

गोष्ट पालकमंत्री नितीन राऊत यांना माहित होताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले. व कारवाई करण्याचे देखील सांगितले. यावर प्रत्युत्तर म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर नागपूर पोलिसांनी कारवाई केली.त्यांचं दोन वर्षाचं इन्क्रिमेंट न देण्याचा आदेश काढण्यात आलाय.

खाकी वर्दीचा गैरवापर करणे त्यांना महागात पडले. त्या पोलिसाने अपंग महिलेचा भाजीपालाचा व्यवसाय पूर्ण उद्ध्वस्त केला यात त्यांचे 2 ते 3 हजार रुपयाचे नुकसान देखील झाले.