अर्जुनीमोर तालुक्यातील 45 वर्षे वरील वयोगटातील नागरिकांसाठी उद्या लसीकरण मोहीम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ मे २०२१

अर्जुनीमोर तालुक्यातील 45 वर्षे वरील वयोगटातील नागरिकांसाठी उद्या लसीकरण मोहीम

 अर्जुनीमोर तालुक्यातील 45 वर्षे वरील वयोगटातील नागरिकांसाठी उद्या लसीकरण मोहीम


 देण्यात येणार पहिला व दुसरा डोस


नागरिकांनी करावी ऑनलाईन नोंदणी
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.14 मे:-

उद्या दिनांक 15 मे रोज शनिवारला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबी टोला, केशोरी, महागाव, चान्ना ,बाकटी, ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव येथे कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी आज दुपारी चार वाजे नंतर नागरिकांनी कोविन वेबसाईटवर आपला ऑनलाइन लसीकरण केंद्र व वेळ ऑनलाइन नोंदणी करावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठी दुसरा डोस पण उद्या शनिवार ला देण्यात येणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र कोरंबीटोला 100 डोस कोवॅक्सिन, 50 कोविशील्ड, केशोरी 100 कोवॅक्सिन,50 कोविसील्ड, गोठणगाव 50  कोवॅक्सिन, महागाव 50 कोवॅक्सिन,50 कोविशील्ड,चान्नाबाकटी 50 कोविशील्ड,धाबेपवनी 100 कोवॅक्सिन, ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध आणि अर्जुनी प्रत्येकी 100 कोविशील्ड डोस ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे व लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद मेश्राम व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.