देशी-विदेशी दारूसाठा जप्त; 4 लाख 60 हजाराचा माल जप्त, आठ आरोपी अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०२१

देशी-विदेशी दारूसाठा जप्त; 4 लाख 60 हजाराचा माल जप्त, आठ आरोपी अटकेत
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)  

शहरातील गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलिया जवळ अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना पाच मोटर सायकल स्वारांसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून चार लाख 60 हजाराचा मुहेमाल जप्त केला ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.

     यातील करण भास्कर मिटपल्लीवार वय  25 वर्ष, गोलू टिल्लू मक्केवार वय 22 वर्ष, मालन बाई भास्कर मिटपल्लीवार वय 50 राहणार गवराळा भद्रावती, कार्तिक दिलीप वनकर वय 22, मयूर गजानन बल्लूर वार वय 18, केवल सरोज गौरकार वय 18 राहणार वनी यवतमाळ, महेश महादेव समर्थ वय 28  किसन गणपत बावणे वय 22 राहणार बल्लारशा असे आरोपीचे नाव आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वणी मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला असता पाच मोटर सायकल वर देशी विदेशी दारू साठा सह मुद्देमाल चार लाख 60 हजार जप्त  करून आरोपीला ताब्यात घेतले ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.