भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्य भावपूर्ण श्रद्धांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मे २०२१

भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्य भावपूर्ण श्रद्धांजली

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर, च्या वतीने स्वतंत्र भारताचे माजी युवा प्रधानमंत्री, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्य भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

चंद्रपूर/ प्रतिनिधी
स्थानिक गांधी चौकातील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार माननीय श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात दिनांक २१ मे २०२१ रोजी भारताचे युवा माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव श्री राहुलबाबू पुगलिया यांनी स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून आदरांजली व्यक्त करताना म्हटले की, राजीवजी गांधी हे खऱ्या अर्थाने संगणक माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार प्रणालीचे जनक होते, त्यांनी धर्मनिरपेक्षता व जाती निरपेक्षतेवर आधारित संविधानाला धोखा पोहोचणार नाही याची काळजी घेतली, देशाची अखंडता अबाधित राखली, पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी गांधी यांनी कृषी, उद्योग, विज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात देशाच्या विकासाच्या योजना राबविल्या त्या सक्षमतेने पुढे राबविण्याचे कार्य राजीवजीनी केले.

तसेच जिल्ह्यात कोरोना महाभयंकर महामारी मुळे लोकांचे हाल होत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्णांना मदत करावी हीच खर्‍या अर्थाने राजीवजींना आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

    याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजाननराव गावंडे, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेन्द्र बेले, चंद्रपूर इंटक अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, नगरसेवक अशोक नागापुरे, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी, विनोद पिंपळशेंडे काँग्रेसचे रतन शीलावार, अनिल तुंगीडवार,बाबूलाल करुणाकर, सुधाकर सिंह गौर, अजय महाडोळे आदींनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.