नवेगावबांध येथे 3 मेला गृहभेट आपुलकीची संजय गांधी निराधार योजनेचा लाभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ मे २०२१

नवेगावबांध येथे 3 मेला गृहभेट आपुलकीची संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

नवेगावबांध येथे 3 मेला गृहभेट आपुलकीची संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाचा अभिनव उपक्रमसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.१ मे:-

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज या मोहिमेअंतर्गत भरून घेण्यात येणार आहे. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या पात्र लाभार्थी तालुक्यात अनेक आहेत. परंतु या योजनेविषयी माहिती नाही किंवा ते खूप गरीब आहेत. सध्या कोरोना काळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थी हे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही.अशा लाभार्थ्यां- -करता शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलाठी कार्यालया अंतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये ३ मे ते ८ मे या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. नवेगावबांध येथे ३ मे सोमवरला ग्रामपंचायत कार्यालयात गृह भेट आपुलकीची हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात संजय गांधी निराधार योजनेतील विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे. सकाळी ११.०० वाजता गावातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रासह उपस्थित राहावे. असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच अनिरुद्ध शहारे व तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी केले आहे. तालुक्यातील २९ ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ३ मे पासून ते ८ मे पर्यंत गृहभेट आपुलकीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावातील लाभार्थ्यांना याची माहिती व्हावी. यासाठी तलाठ्यांनी गावोगावी दवंडी द्वारे ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आदेश अर्जुनी मोरगाव ते तहसीलदार विनोद मेश्राम यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दिले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तहसील कार्यालयातील तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के. एन. वाढई, भानारकर, मुनेश्वर गेडाम, मनीषा देशमुख व अव्वल कारकून आशा तागडे, लुचे, रीता गजभिये यांचे पथके तयार करण्यात आले आहेत. हे पथके दिलेल्या निर्धारित तारखेला व वेळेला ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान ही मोहीम तालुक्यात राबविण्यात आली होती. यावेळी लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन ४४९ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनेतील पात्र ४३० लाभार्थ्यांचे अर्ज तात्काळ मंजूर करण्यात येऊन, त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. हे येथे उल्लेखनीय आहे.तालुक्यातील गरीब व गरजू लाभार्थ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग दर्शवून, ही मोहीम यशस्वी करावी. तसेच विविध योजनांचे आपले अर्ज भरून लाभ घ्यावा. असे आवाहन अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी केले आहे.