भद्रावतीत कम्युनिस्ट पक्षातर्फे 26 मे काळा दिवस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ मे २०२१

भद्रावतीत कम्युनिस्ट पक्षातर्फे 26 मे काळा दिवसशिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी)

संपूर्ण देशात 26 मे काळा दिवस पाळण्यात आला त्याच अनुशंघाने येथे तहसील कार्यालय भद्रावती येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे दिल्ली येथे किसान आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्या करिता कामगार कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा केंद्रीय कमेटी निर्णयानुसार 26 मे रोजी सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्ष / कामगार / किसन / शेतमजूर / युवक / विद्यार्थी / महिला / असंघटित कामगार/ संघटित कामगार हे आपल्या कार्यालयात व कार्यकर्ते आप आपल्या घरावर काळे झेंडे फड कवून मोदी सरकारचा देशव्यापी निषेध करण्याकरीता मोदींच्या जनविरोधी धोरणांचा संपूर्ण देशभर विरोध दर्शविण्यात आला . या आशयाचे निवेदन कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सहसचिव यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना देण्यात आले. 

या निवेदनात प्रमुख मागण्या 

 शेतकरी विरोधी कायदे रद्द करा,  हमी भावावर आधारित शेतमाल विक्री कायदा करा,  असंघटित कामगारांना किमान वेतन कायदा लागू करा, 

 महागाई कमी करा,  पेट्रोल / डिझेल / गॅस चे दर कमी करा , वण जमीन अतिक्रमण धारकांना वण अधिकार कायदा २००६- ०८ संशोधन नुसार जमिनीचे मालकी हक्क द्या, वीज विदेयक रद्द करा,

सार्वजनिक शेत्राचे खाजगीकरण थांबवून देश विकणे बंद करा,  शेतीमालाला (c २ + ५०/: ) असा किमान हमीभाव देण्याचा कायदा करा,  सर्व गरजू जनतेला राशन कार्ड असो वा नसो सर्वांना किमान ४ महिने (एप्रिल ते जुलै ) राशन देण्यात यावे, 

 देशातील सर्व बेरोजगार यांना मासिक ६०००/ रुपये निर्वाह भत्ता द्यावा इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले

मोदी सरकार विरूद्ध घोषणा देण्यात आल्या 

निवेदन देते वेळी काम्रेड डी एचं उपासे / एस के इटंकर, सागर भेलें,  तुषार निशाणे , शिवम गैनवार ,संतोष सलामे, ब्रम्हराज रामटेके/ ,राकेश वनकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.