प्रा.आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे डॉ.दास सह 160 व्यक्तीचे लसीकरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

प्रा.आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे डॉ.दास सह 160 व्यक्तीचे लसीकरण

 प्रा.आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे डॉ.दास सह 160 व्यक्तीचे लसीकरणआज दि.6 मे  रोजी नकोडा येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. दास यांनी लस घेण्यास नोंदणी केली व कोविड लस घेतली. नकोडा परिसरातील 160 नागरिकांनी लसीकरणाच्या लाभ घेतला . लसीकरण केंद्रावर उपस्थित   मा.श्री ब्रिजभूषनजी पाझारे माजी समाज कल्याण सभापती व विद्यमान सदस्य जि.प चंद्रपुर , डॉ. परमेश्वर वाकडकर यांची उपस्थिती होती. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याची सर्वस्व जवाबदारी नकोडा गावातील सरपंच किरण बांदूरकर  व उपसरपंच मंगेश राजगडकर यांनी घेतली आहे. 

ग्रा.प सदस्यांनी गावातील 45 वयोगटावरील लोकांना लसीकरणाची दुसरी लस घेण्यास प्रोत्साहीत केले.  

उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची प्रथम व द्वितीय लस घेण्यास सोयीस्कर झाले.

यावेळी उपस्थित पं. स सदस्य सविताताई कोवे, माजी सरपंच ऋषी कोवे,  ग्राप सदस्य-अर्चना पाझारे , तनुश्री बांदूरकर, सुजाता गिड्डे, हेमा ताला, विठ्ठल (रज्जत) तुरणकर, जसप्रीतसिंग कोर, प्रभाकर लिंगमपेल्ली,कंपा राजय्या,कांचन ताई वाकडे तसेच प्रा. आ.कर्मचारी वर्ग उपस्थित होते.