Top News

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन Anniversary of Zadiboli Sahitya Mandal

श्रीमती पगडपल्लीवार यांच्या वृंदावन काव्यसंग्रहाचे प्रकाशन गोंडपिपरी (प्रतिनिधी) -  झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनाच...

ads

शनिवार, मे २२, २०२१

पुणे विभागातील 13 लाख 8 हजार 990 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे विभागातील 13 लाख 8 हजार 990 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 14 लाख 67 हजार 229 रुग्ण
पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 13 लाख 8 हजार 990 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 67 हजार 229 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 29 हजार 867 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 28 हजार 372 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त्‍ कार्यालयाकडून देण्यात आली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 84 हजार 787 रुग्णांपैकी 9 लाख 6 हजार 245 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 62 हजार 877 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.59 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.02 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 43 हजार 61 रुग्णांपैकी 1 लाख 19 हजार 226 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 113 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
      सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख  40 हजार 604 रुग्णांपैकी  1 लाख 19 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 904 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 673 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सांगली जिल्हा
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 5 हजार 511 रुग्णांपैकी 88 हजार 578 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 853 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 3 हजार 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 93 हजार 266 रुग्णांपैकी 75 हजार 914 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 120 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 593 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 801, सातारा जिल्ह्यात 1 हजार 749, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 643, सांगली जिल्ह्यात  1 हजार 304 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 96 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 679 आहे. पुणे जिल्हयामध्ये  5 हजार 836, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 771, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 709, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 291 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 72 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागामध्ये 20 मे 2021 पर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 25 लाख 31 हजार 160, सातारा जिल्हयामधील 6 लाख 93 हजार 652, सोलापूर जिल्हयामधील 4 लाख 83 हजार 795, सांगली जिल्हयामधील 6 लाख 51 हजार 646 व कोल्हापूर जिल्हयामधील 11 लाख 27 हजार 110 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 80 लाख 89 हजार 380 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 14 लाख 67 हजार 229 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
 (टिप :- दि. 20 मे 2021 रोजी रात्री  9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
0000

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.