राजुरा येथे 11 प्रतिष्ठानांवर कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मे २०२१

राजुरा येथे 11 प्रतिष्ठानांवर कारवाई
राजुरा/ प्रतिनिधी
कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. मात्र राजुरा शहरात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आज दिनांक 11 मे रोजी तहसीलदार हरीश गाडे यांनी शहरातील 11 प्रतिष्ठानांवर कारवाई केली व प्रतिष्ठाने सील केले. शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार गाडे यांनी केलेले आहे.

संचारबंदी सुरू असल्यामुळे महसूल विभागातील पथक यांनी शहरात फेरफटका मारला. शहरातील काही दुकाने नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आले यावेळी पथकाने तात्काळ कारवाई करत दुकाने सील केली यामध्ये
तनवीर साडी सेंट, संसार कापड केंद्र, विहीन कलेक्शन, झाडे इलेक्ट्रिकल्स, नवाज मोबाईल शापी, वांढरे इलेक्ट्रिकल,श्री कृष्णा स्टील सेंटर विवो आस्था मोबाईल, सर्वेश जनरल अंड गिफ्ट सेंटर, गौतम जनरल स्टोअर ,ठाकरे मोबाइल दुकान या प्रतिष्ठानवर कारवाई करून सील करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली असून याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. देशासमोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान याप्रसंगी केले.  जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे विषाणूचा संसर्ग  रोखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व्यावसायिकांनी सहकार्य करावे. ही कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अमित बनसोड, डोणगावकर,
महसूल विभागातील कर्मचारी सुभाष साळवे, घोडसे, गोरे, चीडे, श्रीरामवार,देशमुख ,अत्रे, पोलीस विभागातील अधिकारी यांनी केली.