ग्रामीण भागातील पथदिव्याचे बिल जिल्हा परिषदेने भरावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० एप्रिल २०२१

ग्रामीण भागातील पथदिव्याचे बिल जिल्हा परिषदेने भरावे
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी


शिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी) :
ग्रामीण भागात पथदिव्यांचे बिल आधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येत होते. परंतु मार्च महिन्यातील पथदिव्यांचे बिल भरणा करण्याकरिता जिल्हा परिषदला न देता ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येकी ग्रामपंचायतीला चार ते पाच लाख रुपयांचा घरात हे बिल आले आहे. त्यामुळे हे बिल भरायचे कसे असा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे पडला आहे. हे बिल जिल्हा परिषदेने भरावे अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
                   कोरोना मुळे सर्वच ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाच्या विकासाला ब्रेक लागल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. त्यातच निधी नसल्यामुळे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. त्यातच पथदिव्यांचे चार ते पाच लाखांचे बिल आल्याने मोठे संकट त्यांच्यावर कोसळाचे आहे. महत्वाचे म्हणजे हे बिल भरायचे झाल्यास सामान्य फंडातून हे बिल भरावे लागते परंतु सामान्य फंदात कोणताच निधी शिल्लक नसल्याने करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावाजवळ जंगल भाग आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरात प्राणी हे गावात येऊन माणसाला मारल्याच्या घटना पुढे येत आहे. अशा परिस्थितीत वीजवितरण कंपनीने हि वीज कापली तर मोठे संकट येणार आहे. सादर वीज बिल भरण्यासाठी २४ तासाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. त्यामुळे सदर परिस्थती लक्षात घेता पथदिव्यांचे बिल पूर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेने भरून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.