युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२१

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या



शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी):

भद्रावती शहरातील जवळे प्लॉट येथे राहणाऱ्या युवकांनी आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
मयूर विजय घुसे वय 21 वर्षे राहणार जवळे प्लाट असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे मयूर हा पॉलिटेकनिक चे शिक्षण घेत होता आई वडील वारल्यामुळे तो आपल्या आजी व काका सोबत आपल्या लहान भावा सोबत राहत होता. त्याने मध्यरात्री खोलीमध्ये कोणी नसल्याचे बघून छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती होताच घरच्यांनी भद्रावती पोलिसांना माहिती दिली आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.