मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक विठ्ठलराव सिलमवार यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२१

मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक विठ्ठलराव सिलमवार यांचे निधन


आज त्यांच्या मूळ गावी अंबाडी येथे अंत्यविधी


किनवट- मौजे अंबाडी ता.किनवट येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमदार भीमराव केराम यांचे खंदे समर्थक श्री विठ्ठलराव सिलमवार वय ७५ वर्ष यांचे आज पहाटे चार वाजता त्यांच्या मूळ गावी अंबाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी अंबाडी ता. किनवट येथे आज रविवार दिनांक २५ एप्रिल 2021 रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे श्री विठ्ठलराव सिलमवार यांना अस्थमाचा जुनाट त्रास होता ते बऱ्याच दिवसापासून अन्न बंद केले होते.मृत्युसमयी ते ७५ वर्षाचे होते.श्री विठ्ठलराव सिलमवार हे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी भाजपच्या तालुका किसान आघाडीचे तालुका संघटक सोबतच सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग राहत होता.ते अंबाडीचे माजी सरपंच कैलाश सिलमवार,कृषि विभागातील राजु सिलमवार यांचे वडील तर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री रामलू सिलमवार यांचे मोठे बंधू होय.त्याच्या पच्यात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,दोनभाऊ,बहीण,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे श्री विठ्ठलराव सिलमवार यांच्या निधनाने अंबाडी गावावर शोककळा पसरला आहे.