३० एप्रिल २०२१
पाण्याखालून दारूची तस्करी; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमित तेलंग/ प्रतिनिधी
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, अवैध दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवून दारू आणतात. एका चारचाकी वाहनात पिण्याच्या पाण्याच्या बॉटलखालून पोलिसांनी देशीदारूचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किमत २९ लाख ९६ हजार रुपये आहे.
नागपूरहून खांबाडामार्गे एक चारचाकी वाहनातून दारूसाठा आणण्यात येत होतो. या वाहनासमोर दुसरे एक वाहन होते. त्या मार्गात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यामुळे पायलेqटग करणाèया वाहनाने गस्तीवरील पोलिसांची नजर चुकवून दुसèया मार्गाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या मार्गावर उपविभागीय पोलिस अधिकाèयांचे पथक गस्तीवर होते. या पथकातील पोलिसांनी एमएच ४९ बी-के ३०३५ या क्रमांकाचे वाहन अडवून तपासणी केली. या वाहनातून पोलिसांनी एक लाख रुपये आणि महागडे मोबाईल ताब्यात घेतले. याच वाहनामागे असेलल्या एम एच-०- २७०४ हे वाहन पोलिसांनी अडविले. या वाहनात वरच्या भागात बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, तर आतमध्ये देशी दारूने भरलेल्या दीडशे पेट्या पोलिसांना आढळल्या. बिसलेरी बाटल्यांचा देखावा करून अवैध दारू चंद्रपुरात आणण्यात येत होती. याप्रकरणी पोलिसांनी राहील सलीम खान पठाण, शेख जुबेर शेख गुलाल आणि रणजित चंद्रमणी मेश्राम यांना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
