नियम मोडल्यास गुन्हा दाखल करणार : तहसीलदार हरीश गाडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ एप्रिल २०२१

नियम मोडल्यास गुन्हा दाखल करणार : तहसीलदार हरीश गाडे
पाच प्रतिष्ठानांवर कारवाई...
सहकार्य करण्याचे आवाहन..

राजुरा/ प्रतिनिधी
कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. जिल्ह्यत जनता कर्फ्यु असल्याने सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवन्य चे आदेश आहेत. मात्र राजुरा शहरात शासनाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे शहरातील पाच प्रतिष्ठानांवर आज दी.22एप्रिल ला तहसील प्रशासनाने सक्तीची ताकीद दिली व पाचही प्रतिष्ठाने सील केले.यापुढे नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा तहसीलदार हरीश गाडे यांनी दिलेला आहे.

संचारबंदी सुरू असल्यामुळे महसूल विभागातील पथक यांनी शहरात फेरफटका मारला. यावेळी सोमनाथपुर वार्ड, नाका नंबर 3, नेहरू चौक येथील काही प्रतिष्ठाने दुपारी 12 नंतर सुरू असल्याचे आढळले. यावेळी महसूल विभागाने सदर प्रतिष्ठानांना सक्तीची ताकीद दिली व पुढील आदेशापर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले.तहसीलदार हरीश गाडे यांच्या धडक कारवाईनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मध्ये धडकी भरलेली आहे.

 कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली असून याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. देशासमोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान याप्रसंगी केले. शासनाचे नियम मोडल्यास यापुढे गुन्हा दाखल करण्यात करण्यात येईल असा इशारा  तहसीलदार हरीश गाडे यांनी दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला सर्वांनी सहकार्य करावे. शासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. अनावश्यक कोणीही घराबाहेर फिरवू नयेत . या नियमांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे विषाणूचा संसर्ग  रोखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व्यावसायिकांनी सहकार्य करावे. ही कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील कर्मचारी सुभाष साळवे, विनोद गेडाम, समीर वाटेकर, पोलीस विभागातील अधिकारी यांनी केली.