ईल्ली व सारी रुग्णांचे सर्वेक्षण पुढे ढकलावे : सरकार्यवाह सुधाकर अडबाले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२१

ईल्ली व सारी रुग्णांचे सर्वेक्षण पुढे ढकलावे : सरकार्यवाह सुधाकर अडबाले
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मागणी

चंद्रपूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्यामुळे संचार बंदी सुरू आहे. कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावलेले आहेत .शाळा व महाविद्यालय बंद आहेत. शिक्षकांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे अश्यातच सारी व इल्ली रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे शिक्षकांना फर्मान सोडले आहे. या सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्यात यावे व हे सर्वेक्षण कोरोना लाट कमी होई पर्यंत पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केलेले आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. अनेक शिक्षक कोविड बाधित झालेले आहेत.अनेकांनी शिक्षकांनी आपला जीव गमवावा लागलेला आहे. कोरोणा विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने शाळा महाविद्यालय बंद केलीत. व कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. अशा स्थितीत खाजगी व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना सारी व इल्ली रुग्णांचे सर्वेक्षणाचे काम देणे अतिशय धोकादायक आहे.
राज्यातील खाजगी अनु . प्राथ / माध्य शाळेतील शिक्षकांना कोवीड -१९ अंतर्गत सारी / ईल्ली या रोगाचे रुग्न शोधण्यासाठी आदेश निघाले आहेत. राज्यातील जवळपास सर्व जिल्हयात कोवीड -१ ९ चे रूग्न झपाटयाने वाढत आहे .

मृत्युचे प्रमाण सुध्दा वाढत आहे . अनेक शिक्षकांचा कोवीड -१ ९ मुळे मृत्यु सुध्दा झालेला आहे . संपूर्ण राज्यात शाळा महाविद्यालये बंद असुन संचारबंदी लागु आहे व शिक्षकांना वर्क फॉर्म होम ची सुविधा देण्यात आलेली असुन शिक्षक आपल्या निकालाच्या कामात व्यस्त आहे . अशा परिस्थीतीत शिक्षकांना घरोघरी पाठवून माहीती मागविणे , तापमान तपासणे , ऑक्सीजन तपासणी करायला लावणे म्हणजे सदर कर्मचाऱ्यांना मृत्युच्या दाढेत ढकलणे होय . करीता कोरानाची ही लाट ओसरे पर्यंत सदर सर्वेक्षण कार्याला स्थगिती देण्यात यावी अशी विदर्भ माध्य.शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे . याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले.