राजुऱ्यात सात दिवसाचा जनता कर्फ्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१८ एप्रिल २०२१

राजुऱ्यात सात दिवसाचा जनता कर्फ्यू
राजुरा/ प्रतिनिधी
                   राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड -19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक 1897 दिंनाक 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे.  त्याअनुषंगाने नागरीकांची एका ठीकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व कोरोना (कोव्हीड - १९ ) विषाणूमुळे मानवी जातीस निर्माण झालेली भीती , नागरिकांचे आणि सार्वजनिक आरोग्याचा  सुरक्षितेकरिता  तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यस्था अबाधित राखण्याकरिता नागरिकांचे एका ठिकाणी होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करणे अत्यावशक झाले आहे. त्याअनुषंगाने  राजुरा शहरात 7 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे सदर कर्फ्यू  दिनांक १९  एप्रील २०२१  पासून ते  दिनांक  २६ /४/२०२१  पर्यत  राहील यात सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस  फिरण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत ,फक्त दवाखाने, औषधी दुकाने तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा , दुध विक्री साठी सकळी  6.०० ते सकाळी  ९.०० वाजेपर्यंत राहील या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, किराणा दुकाने,  दैनदिन भाजीपाला, चिकन मटन मार्केट   , फळ विक्री , मार्केट  व बाजारपेठा,मॉल व आस्थापना बंद राहील तसेच जिल्हयात 144 लागु असल्यामुळे एकत्र जमावास आणि  संचार करण्यात  बंद आहे  याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
                 सदर जनता कर्फ्युस शहरातील नागरिकांनी , व्यापारी संघटनांनी , सगळे दुकानदार  आणि विक्रेते यांनी सहकार्य करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे तरच आपल्याला कोरोना वर मात करता येईल सगळ्यांनी घरी राहावे , मास्क आणि सॅनिटायजर चा नियमित  वापर करावा असे आवाहन राजुरा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.