चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वाळू तस्करांवर धाडसत्र , सिंदेवाही, चंद्रपूर सह विविध तालुक्यात १० वाळु तस्करांना अटक, ७३ लाखाचा रेतीसाठा जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२१

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वाळू तस्करांवर धाडसत्र , सिंदेवाही, चंद्रपूर सह विविध तालुक्यात १० वाळु तस्करांना अटक, ७३ लाखाचा रेतीसाठा जप्तवाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून, नदी, नाले पोखरून पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे वाळू तस्करी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून वाळू तस्करी केली जात असून, एलसीबीने वाळू तस्करांविरोधात धाडसत्र सुरू केले असून, सोमवारी १० वाळूतस्करांना अटक करून तब्बल ७३ लाख ७२ हजारांचा रेतीसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांनी अवैध वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिले आहेत. दरम्यान अरविंद साळवे यांनी वाळू तस्करांवर कारवाईची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली असून, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संंदीप कापडे यांच्या नेतृत्वात तीन पथके नियुक्त केली आहेत. या पथकांनी रामनगर, चंद्रपूर शहर, सिंदेवाही, भद्रावती, राजुरा या पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफियांची माहिती संकलित करून धाडमोहीम सुरू केली. दरम्यान, रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन, चंद्रपूर शहर दोन, सिंदेवाही २, भद्रावती २ आणि राजुरा येथे एका वाळू माफियाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.