नागपूरला रेमडेसीवीरचा पुरवठा करा नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ एप्रिल २०२१

नागपूरला रेमडेसीवीरचा पुरवठा करा नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

नागपूरला रेमडेसीवीरचा पुरवठा करा

नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेशनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागपूर जिल्ह्यात 10 हजार रेमडेसीवीरचा तातळीने पुरवठा करा, असे आदेश आज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

नागपूर खंडपीठाने स्वतःहुन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यात शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहे. याचा प्रभाव कमी करण्यासाठी रेमडेसिवीर उपयोगी असल्याचे म्हटले जाते. परिणामी, नागरिकांना रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचे खंडपीठाने राज्य सरकार, महानगरपालिकेला दिले आहेत.