माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले - महापौर राखी संजय कंचर्लावार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ एप्रिल २०२१

माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले - महापौर राखी संजय कंचर्लावार

 माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले - महापौर राखी संजय कंचर्लावार 
चंद्रपूर, ता. २५ : 
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले, अशा शोकभावना चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.
मृद भाषी, शांत व संयमी स्वभावाचे धनी होते. म्हणूनच त्यांच्याविषयी जनमानसाच्या मनात आदर होता. पक्षीय राजकारण, मतभेद विसरून त्यांनी जनसेवा केली. वरोरा- भद्रावती विधानसभा मतदार संघात त्यांनी अनेक लोकोपयोगी विकास कामे केली. सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा नेता आपल्यातून निघून गेल्याचे दुःख आहे, अशा भावना चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.