कोरोणा संकटात समाजासाठी झटतोय प्राध्यापक दिनेश घागरगुंडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० एप्रिल २०२१

कोरोणा संकटात समाजासाठी झटतोय प्राध्यापक दिनेश घागरगुंडे
कोरोणा संकटात समाजासाठी झटतोय प्राध्यापक दिनेश घागरगुंडे..

राजुरा/ प्रतिनिधी
जागतिक महामारीच्या संकटात प्रत्येक देश आणि माणूस हतबल झालेला आहे. कोरोनाविषाणूने
जगासमोर मोठे आव्हान निर्माण केलेले आहे. शहरापासून तर खेड्यापर्यंत कोरोणा विषाणूचा फैलाव झालेला आहे. यामुळे सामान्य जीवन भयभीत झालेले आहे. अशा संकटात जनजागृती करीत समाजाला धीर देण्यासाठी प्राध्यापक दिनेश घागरगुंडे धडपड करीत आहे.

राजुरा तालुक्यातील गोवरी गावात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाने गाव 'सिल' केले आहे. त्यानंतर मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण गाव बंद झाल्यामुळे दररोज लागणारा भाजीपाला, अनाज मिळवायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला मात्र गोवरी येथील संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिनेश घागरगुंडे याने संकटकाळात आपल्या वॉर्डातील नागरिकांसाठी लोकांना जागृत करून सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे तर संकट काळात तक्षशिला परिसरातील रोपट्यांची निगा राखत आहे. संकटात प्राध्यापक दिनेश घागरगुंडे आणि ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कासवटे यांचे कार्य समाजासाठी आधारस्तंभ ठरले आहे.त्यांच्या कार्याचे समाजात कौतुक होत आहे.
मागील दोन आठवड्यापासून गावात तापाची साथ असल्यामुळे आरोग्य शिबीर लावण्यात आले होते. यात कोवीड बाधित संख्या मोठ्या प्रमाणावर आढळल्याने शासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. संपूर्ण गावाच्या सीमा सील केल्यात. त्यामुळे सामान्य जनतेला बाहेर पडणे कठीण झाले. कोरोनाविषाणू बाबतची भीती कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रेरणादायी कार्य प्राध्यापक दिनेश घागरगुंडे आणि ग्राम पंचायत सदस्य सिद्धार्थ कासवटे करीत आहेत. गाव सील केल्यानंतर जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, अनाज कुटुंबांना मिळण्यासाठी पुढाकार घेतला. वॉर्डातील नागरिकांना बाहेर कुठेही न भटकू देता भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वार्डात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मास्क वितरण केले व आरोग्यबाबत जनजागृती केली. वार्डातील आजारी व्यक्तींना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः हा पुढाकार घेत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वार्डातील युवकानी स्वतः पुढाकार घेऊन वार्ड सील केला आहे. एवढेच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांना वार्डात प्रतिबंध ही केलेला आहे. कोवीड चाचणी केल्यानंतर वार्डात प्रवेश आहे.


वॉर्डातील तक्षशिला भवनासमोर असलेल्या बगीच्या मधील रोपट्यांना दररोज पाणी देऊन त्याची निगा राखण्याचे काम प्राध्यापक दिनेश घागरगुंडे करीत आहे. संकट काळात स्वतःच्या कुटुंबाकडे कमी वेळ देऊन समाजासाठी सत्कार्य करण्यासाठी धडपडत आहे. गरजू नागरिकांना मदतीचा हात समोर देत आहेत. संकटकाळात नागरिकांना मार्गदर्शन करून मनोबल वाढवण्यासाठी आधार देत आहे आहेत. पेशाने शिक्षक असणाऱ्या प्राध्यापक दिनेश घागरगुंडे याचे समाजात कौतुक होत आहे. समाजातील नागरिकही त्यांच्या सूचनांचे पालन करीत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोविड संकटात प्रत्येक जण शासनाच्या नियमांचे पालन करीत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.