पक्ष्यासाठी उभारा पाणपोईच्या गुढ्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ एप्रिल २०२१

पक्ष्यासाठी उभारा पाणपोईच्या गुढ्या
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन च्या वतीने प्रकाश हायस्कूल चा प्रागणात आज दि.6 (मंगळवार) पाणपोई उभारण्यात आली.
पाणपोई उभारणीच्या निमित्ताने तप्त उन्हाळा लक्षात घेऊन यंदा प्रत्यकाने गुढीपाडवानिमित्ताने पक्ष्यासाठी पाणपोई सुरु करण्याचा नवसंकल्प करण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे. प्रत्येकाने मानवधर्म जोपासत तप्त उन्हाळात मुक्या प्राण्यासाठी व पशू पक्ष्यासाठी पाणपोई सुरवात करावी.
या कार्यक्रमाला प्रकाश हायस्कूल चे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे, कान्द्री येथील ग्रामसेवक नरेंद्र गाडगे, वसंत ठकराले, गणराज उईके, मिलिंद वाघमारे व उपस्थित होते.