नवेगावबांध येथे आज रात्री आठ वाजेपासून दोन दिवसांचा कडकडीत विकेंड लॉकडाऊन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ एप्रिल २०२१

नवेगावबांध येथे आज रात्री आठ वाजेपासून दोन दिवसांचा कडकडीत विकेंड लॉकडाऊन

नवेगावबांध येथे आज रात्री आठ वाजेपासून दोन दिवसांचा कडकडीत विकेंड लॉकडाऊनअत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने दोन दिवस बंद

आजपासून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये - सरपंच अनिरुध्द शहारे

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.9 एप्रिल:-

ब्रेक द चैन अंतर्गत महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन चा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा बंद बाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्या आदेशानुसार आज दिनांक नऊ एप्रिल रोज शुक्रवार च्या रात्री आठ वाजेपासून ते दिनांक 12 एप्रिल रोज सोमवारच्या सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद राहतील. ब्रेक द चैन या अंतर्गत दोन दिवसाचा कडकडीत विकेंड लॉक डाऊन पाळण्यात येणार आहे.या कालावधीत नवेगावबांध ग्रामवासीयांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. असे आवाहन ग्रामपंचायत नवेगावबांध यांच्यावतीने करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत असलेले आस्थापने व दुकाने सुरू राहतील. याव्यतिरिक्त इतर आस्थापने व दुकान सुरू आढळल्यास तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरीक घराच्या बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम 1987 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल. असे या आदेशात म्हटले आहे. आज रात्री आठ वाजेपासून ते सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत घोषित केलेला आहे. कडकडीत लॉक डाऊन ला नवेगाव बांध येथील सर्व ग्रामस्थानी सहकार्य करावे. असे आवाहन नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे व ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी केले आहे.