नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य : नगराध्यक्ष अरुण धोटे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२० एप्रिल २०२१

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य : नगराध्यक्ष अरुण धोटे
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य... नगराध्यक्ष अरुण धोटे..

घराबाहेर पडू नका आवाहन.

राजुरा/ प्रतिनिधी
कोरोनाच्य दुसऱ्या लाटेत चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. अशा संकट स्थितीमध्ये प्रत्येकाने आपले आरोग्य आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे .शहरातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी जनता कर्फ्यू उस्फूर्तपणे पाळण्यात येत आहे. नागरिकाने आपले आरोग्य, आपल्या कुटुंबाचे जबाबदारी जपण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.

राजुरा शहरातही कोवीडचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जनता कर्फ्यू पाडण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग ग्रामीण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोणाची साखळी तोडण्यासाठी घरी रहा सुरक्षित रहा या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग लहान मुले व तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात होत आहे .त्यामुळे घरातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी तरुणानी घराबाहेर फिरू नये. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रत्येक वार्डात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा .तसेच आरोग्य संदर्भात कुठलीही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावा .असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे व मुख्याधिकारी जूही अर्शिया यांनी केले आहे.